नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. शेतकऱ्यासाठी हा मोठा दिलासा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि केंद्र सरकारमधील रचनात्मक संवाद सुरु होईल, अशी आशा पवार यांनी व्यक्त केली.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही कायद्यांना सथगिती देण्याच्या कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारला संधी मिळाली आहे. सर्वांशी चर्चा करावी आणि शेतकरी प्रश्नावर निर्णय घ्यावा, कायद्यांचा पुनर्विचार करा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
A welcome decision taken by the Apex Court of India to put on hold the implementation of three farm bills and set up a four member committee to resolve the issues. #SupremeCourt #FarmLaws
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 12, 2021
थोडक्यात बातम्या-
“राम मंदिराची निर्मिती करणं हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं स्वप्न होतं”
राज्यातील काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष फायटर असावा- विजय वडेट्टीवार
आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा- सुप्रिया सुळे
काहीही झालं तरी मी दिल्लीत आंदोलन करणारच- अण्णा हजारे
मुलाच्या सततच्या पैशांच्या मागणीला जन्मदात्री वैतागली; उचललं अत्यंत धक्कादायक पाऊल