बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा, कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये- शरद पवार

मुंबई | केंद्र सरकारने अजूनही शहाणपणा दाखवावा. कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

नवी दिल्लीत जे घडतंय त्याला समर्थन नाही. पण ते का घडतंय? याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शांततेने आंदोलन करणारा शेतकरी संतप्त का होतो याची जबाबदारी घ्यायला हवी होती, असं शरद पवारांनी म्हटलंय.

गेल्या 60 दिवसांपासून पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी भूमिका घेऊन आंदोलन केलं. कडाक्याच्या थंडीतही हे शेतकरी बसून आपलं म्हणणं मांडतात, संयम दाखवतात ही अभूतपूर्व गोष्ट आहे. इतक्या संयमाने भूमिका घेणारे शेतकरी असताना केंद्राने सकारात्मक पुढाकार घेऊन मार्ग काढायला हवा होता, असं शरद पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका- कंगणा राणावत

“राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज शरम दिसली”

14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी दोन मुलं; तरीही IPS होण्यापासून तिला कोणी रोखू शकलं नाही!

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील काही भागातील इंटरनेट सेवा बंद

“दिल्लीतील शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More