मुंबई | हे सरकार 5 वर्षे चालणार यात मला शंका वाटत नाही. सरकारचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावावर हे अवलंबून असतं. उद्धव ठाकरेंची भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही, असं शरद पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. ते एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र , माझा व्हिजन’ या कार्याक्रमात बोलत होते. शरद पवारांनी यावेळी विविध विषांवर भाष्य केलं.
सर्व एकदा उभं करून द्यायचं आणि सगळं नीट चालायला लागलं की मी लांब व्हायचं. गरज पडली, मदत मागितली की मी आहेच. यापेक्षा जास्त सरकारशी संबंध ठेवायचा नाही हा निर्णय घेतला असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
दरम्यान, शिक्षणाचा दर्जा टिकवण्यासाठी काम आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांवरील ओझं कमी करणं गरजेचं असल्याचही शरद पवारांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंंतर शरद पवार-उद्धव ठाकरे आज एका मंचावर
आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सोनिया गांधींची भेट
महत्वाच्या बातम्या-
ना जातीचे ना धर्माचे छ. शिवाजी राजे रयतेचे- श्रीपाल सबनीस
“आमच्या महाराजांचा जयजयकार करायला याला कमीपणा वाटतो का?”
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करताना नवाब मलिक गप्प; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल
Comments are closed.