“एवढी मोठी फाटाफूट झाली पण राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो”
मुंबई | राज्यात एवढी मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी शरद पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगले काम केल्याचे ठिकठिकाणी ऐकायला मिळते. प्रदेशाध्यक्षांनी देखील सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना आणि जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालवला, असं पवार म्हणाले.
सुदैवाने आपल्याकडे विरोधी पक्षनेतेपद असल्यामुळे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ आपल्याकडे आहे. तरीही लोकांवर अन्याय होत राहिला तर लोकशाहीच्या चौकटीत रस्त्यावर उतरायचा देखील निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, असंही शरद पवारांनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
एकनाथ शिंदेंचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना झटका; ‘तो’ आदेशच बदलला
मोठी बातमी! राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
कॉमेडियन वीर दासने पुन्हा उडवली भारताची खिल्ली, म्हणाला…
धक्कादायक! गुजरातमधून 350 कोटींचं हेराॅइन जप्त
‘या’ कारणामुळे मुख्याध्यापकाचा पगारच कापला, कारण ऐकून नेटकरी संतापले
Comments are closed.