मोदींना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही- शरद पवार

पुणे| मोदी सरकारच्या (Modi Government) निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाला असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केला आहे. यावरून देशातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. विरोधकांनी यावरून मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

मलिकांच्या या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

काश्मीरमधील पुलवामा येथे आपल्या 40 जवानांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. ते भाजपच्या विचाराचे होते. भाजपनेच त्यांनी नियुक्त केली होती. आता राज्यपालपदाची मुदत संपल्यानंतर त्यांनी खरी परिस्थिती सांगितीली, असं शरद पवार म्हणाले.

आपल्या सैन्याला एअरक्राफ्ट आणि आवश्यक ती साधनं वेळेवर न दिल्याने ही घटना घडली. तसेच पंतप्रधांनी त्यांना या विषयावर शांत राहायला सांगितल्यांचही त्यांनी सांगितलं. ही सत्य परिस्थिती होती. यामुळे मोदी सरकारला सत्ते बसण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-