बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राम मंदिरासाठी ट्रस्ट, तर मग मशिदीसाठी का नाही?- शरद पवार

लखनऊ | तुम्ही जसं राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना करू शकता तर मग मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना का निर्माण करू शकत नाही? देश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. एएनआयने या संदर्भात माहिती दिली आहे.

लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे, असा आरोप शरद पवारांनी केला आहे. लखनऊ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलनाप्रसंगी शरद पवार बोलत होते.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापन करण्यात आली आहे. एकीकडे दिल्लीत या ट्रस्टची आज पहिली बैठक पार पडली. तर दुसरीकडे लखनऊ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला मशिदीच्या निर्मितीसाठी तुम्ही ट्रस्टची स्थापना का करू शकत नाही? असा प्रश्न केला आहे.

दरम्यान, जनता आता तुमच्या भूल थापांना बळी पडणार नाही. सीएए आणि एनआरसीमध्ये काही त्रुटी आहेत. यामध्ये मुस्लीम अल्पसंख्यांकांकडे दुर्लक्ष केलं गेलं असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं.

 

ट्रेंडिंग बातम्या- 

तृप्ती देसाईंचं चारित्र्यहनन केल्याप्रकरणी पहिली तक्रार दाखल

…तर मला कपडे काढून जावं लागेल; अजित पवारांची टोलेबाजी

महत्वाच्या बातम्या- 

मल्लखांबच्या माध्यमातून शिवरायांना अनोखी मानवंदना, हा व्हिडीओ पाहाच…

इंदोरीकर महाराजांनी थोडा संयम ठेवावा- राधाकृष्ण विखे पाटील

स्वगृही परतण्याच्या चर्चांवर राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More