Top News

‘उद्याचं चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण माहीत नव्हता’; शरद पवारांचा दानवेंना टोला

मुंबई | केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपचं सरकार असेल, असा दावा केलाय. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दानवे ज्योतिष शास्त्राचे जाणकार असल्याचा आणि उद्याचे चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण मला माहीत नव्हता, असा टोला शरद पवार यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला आहे.

पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. सत्ता गेल्यामुळे त्रास होत असल्याने फडणवीस सारखं बोलत असतात. त्यामुळेच त्यांनी मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल असं वारंवार बोलावं लागतं, असं शरद पवार म्हणाले.

लॉकडाऊन हा सरकारचा विषय आहे. त्यावर सरकारच भूमिका घेईल. त्यावर मी बोलणार नाही, असं पवार म्हणाले. तसेच कोरोनाची लस रास्त किंमतीत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं पवारांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“त्यांचे बाप नव्हते तेव्हापासून भाजपमध्ये काम केलं, आता आयत्या पिठावर रेघा मारत आहेत”

शरद पवारांच्या उपस्थितीत जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती- संजय राऊत

“लक्षात ठेवा, पुढच्या दोन-तीन महिन्यात राज्यात भाजपचं सरकार असेल”

टीम इंडियाला मोठा धक्का; रोहित-इशांत शर्मा पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधून बाहेर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या