पुणे | सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य केलं आहे.
सचिनने वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तर काळजी घेतली पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.
सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर काही भूमिका घेतली असली, तरी सामान्य लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तेव्हा काळजी घेतली पाहिजे, हा माझा सचिनला सल्ला आहे, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, मोदी सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी देखील शेतकरी आंदोलनात लक्ष घालण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
जॅकलिनने प्रियांका चोप्राचं जुहूमधील जुनं घर केलं खरेदी, किंमत वाचून आश्चर्यचकित व्हाल!
“शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही”
भाजपनं उंटावरुन शेळ्या राखणं बंद करावं- प्रणिती शिंदे
शरजील उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली- संजय राऊत
शेतकरी आंदोलनावर खासदाराचं असं भाषण, जे प्रत्येकाने पाहिलंच पाहिजे!