अहमदनगर | सिरम कंपनीच्या संस्थापकांनी विनंती करुनही आपण कोरोना लस न घेतल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेंडी गावात माजी आमदार कै.स्व.यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचं अनावर शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते बोलत होते.
मला सिरमच्या संस्थापकांनी कोरोना लस घेण्यास सांगितलं पण मी त्यांना आधी नगरला जाऊन येतो आणि तेथील परिस्थिती पाहून नंतर गरज वाटल्यास थेट तुझ्याकडे येतो, असं शरद पवार म्हणाले.
ज्या काळात फार कुणी घराबाहेर पडत नव्हतं, तेव्हा मी राज्याचा दौरा केला आणि सर्व वैद्यकीय डॉक्टर एकत्र केले. तेव्हा मला खासगी डॉक्टर म्हणायचे फिरू नका, पण मी म्हणालो सर्व लोक अस्वस्थ आहेत, असं शरद पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर
“रामभक्तांना भिकारी म्हणता, शिवसेनेचं हे कसलं हिंदुत्व?”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत, इतरांसारखे भिकारी नाहीत”
एक मुलगा अन् दोन तरूणी, भररस्त्यात सुरू होती हाणामारी; व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
“माझं नाव सत्तार, मी सत्तेतच राहणार”