बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारणी मंडळींसाठी प्रेरणादायी- शरद पवार

पुणे | तेजस्वी यादव यांनी खूप मेहनत घेतली. बिहारमध्ये NDAला बहुमत मिळण्याचा अंदाज असला तरी तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

बिहार निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी RJDचे नेते तेजस्वी यादव यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

बिहारमध्ये भाजप विरुद्ध एकटे तेजस्वी यादव अशीच निवडणूक पाहायला मिळाली. तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध पंतप्रधान, केंद्रातील अनेक मंत्री, स्थानिक राजकीय पक्ष आणि प्रशासनाची ताकद होती, अशा परिस्थितीतही तेजस्वी यादव यांनी चांगली लढत दिली,  असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बिहारमध्ये तरुण नेतृत्व उदयाला येत आहे. पण तिथे अपेक्षेनुसार निकाल लागले नाहीत, असंही पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून मुख्यमंत्री झाल्यास नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत- संजय राऊत

“फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यानेच भाजपला बिहारमध्ये यश”

“शब्द पाळला नाही तर काय होतं याचा अनुभव भाजपनं महाराष्ट्रात घेतलाय, त्यामुळे…”

शिवसेनेला बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

“नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More