“उद्धव ठाकरेंसारख्या सरळमार्गी नेत्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | निवडणूक आयोगाने (Election commission) दिलेल्या निकालानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशात यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

बाळासाहेबांचा स्वभाव होता की जो सहकारी असेल त्याला साथ द्यायची. मात्र ज्या सहकाऱ्याला साथ दिली त्यानेच हळूहळू ज्यांनी आपल्याला मोठे केले त्यांना बाजूला केले. देशाच्या इतिहासात कधी पाहिले नाही की निवडणूक आयोगाने एखादा पक्ष, त्याची निशाणी या सगळ्या गोष्टी दुसऱ्याला देऊन टाकल्या पण हे घडलं. हे सर्व भाजपच्या नेत्यांनी घडवलं, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत.

आज मत मागण्यासाठी आम्ही येतोय त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही नवी राजकीय संस्कृती देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी संघटना उभी केली. शिवसेनेचा अर्थ बाळासाहेब ठाकरे (Balsaheb Thackeray) यांच्या विचाराने उभी झालेली संघटना. आज ही संघटना कोणी चालवायची याबद्दल बाळासाहेबांनी सांगितलं होतं की संघटेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. भाजपमधील काही लोकांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचं पद काढून घेतले आणि शिवसेनेमधून काही पन्नास आमदार बाहेर पडून त्यांनी संपूर्ण राज्याची सत्ता हातात घेतली, असं सांगत पवारांनी भाजप (Bjp)वर निशाणा साधलाय.

शिवसेना आमचीच असे ते सांगत आहेत. राजकारणात इतकी फसवेगिरी कधी नव्हती, ती अलीकडच्या काळात आली आहे. हे महाराष्ट्रात वाढणं योग्य नाही. हे लोकांमध्ये जाऊन सांगावं यासाठी नाना काटे यांच्या निवडणूक प्रचाराची संधी आहे, म्हणून मी याठिकाणी आलो, असं पवारांनी सांगितलं.

आता जरी मी निवडणूक लढवत नसलो तरी महाराष्ट्रात जर चुकीच्या प्रवृत्ती वाढत असतील आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सरळमार्गी नेत्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असेल तर स्वस्थ बसून चालणार नाही. असं करणाऱ्या लोकांना त्यांची योग्य जागा दाखवली पाहीजे. ही संधी आज आली आहे, असं पवारांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-