महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अबोल असले तरी चतुर आहेत- शरद पवार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अबोल असले तरी चतुर आहेत, त्यांनी तीन पक्षांचं सरकार यशस्वीपणे चालवलं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

शरद पवार यांनी सरकारच्या कामगिरीची स्तुती केली आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वालाही दाद दिली. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि सरकार चालवत असताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलं ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत, असं शरद पवार म्हणालेत.

हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ असून त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत आहे. वर्षभरात संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम या शासनाने केले आहे. त्यामुळे संकटकाळात बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही, इतके उत्तम काम या शासनाने केले आहे, असंही पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

कंगणा राणावतचं ट्विटर हँडल बंद करण्यात यावं यासाठी हायकोर्टात याचिका दाखल!

खळबळजनक! मुंबईत 2 लेकींची हत्या करून वडिलांनी संपवलं आयुष्य

सोलापूरच्या शिक्षकाला 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर!

शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांच्या आरोपांवर भावजय पल्लवी आमटे म्हणाल्या…

“जे खरं आहे ते आम्ही दाखवतोय, रुग्णसंख्येबाबत कुठलाही लपंडावाचा खेळ केलेला नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या