“मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात जाणे पचनी पडलं नाही”
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीत अनेक खुलासे केले आहेत. या आत्मकथेत 2015 ते आजपर्यंत झालेल्या घडामोडींची माहिती पवार यांनी नमूद केली आहे.
‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकामधूनही अनेक बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी याबरोबरच महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत या पुस्तकात भाष्य करण्यात आले आहे.
उद्धव यांनी संघर्ष न करता, न लढता राजीनामा दिला त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले. केंद्र सरकार आणि राजभवन यांनी महाविकास आघाडी हटवण्याचा कट रचला, असं पवार यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शर्ट, पँट अशा मुंबईकर मध्यमवर्गीयांच्या पोशाखात सहजपणे वावरण्याचे एक अप्रुप सर्वांनाच होते. करोना महामारी सुरू झाल्यानंतर त्यांनी फेसबुकवर साधलेला सहज संवाद मध्यमवर्गीयांना भावला. त्यांना सहकार्य केले पाहिजे, असं या वर्गाला वाटत होतं. मंत्रालयाच्या प्रशासकीय वर्गातही त्यांच्याविषयी आपलेपणाची भावना होती. या झाल्या उद्धव यांच्या जमेच्या बाजू. मात्र, उद्धवना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्रालयात फक्त दोनदा जाणे, आमच्या फारसे पचनी पडणारे नव्हते, असे पवार यांनी आत्मकथेत पान क्रमांक 318 वर नमूद केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.