नाशिक महाराष्ट्र

शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय- शरद पवार

नाशिक | महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचा भगवा फडकवा, हे भाषण 30 वर्षांपासून ऐकत आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवायच्या की स्वतंत्र, हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील, असं पवारांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये. कांद्याबाबतचे बहुतेक निर्णय हे केंद्र सरकारच्या हातात असतात, असं पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये- शरद पवार

कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच रामदासा…’; आठवलेंना गृहमंत्र्यांकडून ‘आठवले पॅर्टन’ सदिच्छा 

राज्यपाल कोट्यातील एक जागा देण्याचं तीन महिन्यापूर्वी ठरलं होतं, पण आता…- राजू शेट्टी 

आता कुमार सानूची ‘जान वाचणं’ कठीण आहे!- शालिनी ठाकरे

‘भाजपची भूमिका डबल ढोलकी’; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं भाजपला प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या