बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय ते योग्य नसून कृषी कायद्यात बदल आवश्यक”

मुंबई | गेल्या अनेक महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर कृषी आंदोलन चालू आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचं आंदोलन चालू आहे. मात्र या आंदोलनाबाबत केंद्र सरकार गंभीर नसल्याचं दिसून येतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्राच्या कृषी कायद्यावर आपली भूमिका मांडली आहे.

कृषी कायद्यात दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्यासाठी दुरुस्ती विधेयक आणलं पाहिजे. ते अधिक चांगले होईल, असं शरद पवार म्हणाले. त्यासोबतच दोन दिवसाच्या अधिवेशनात कृषी कायदा येईल असं वाटत नाही आणि आला तरी सगळ्यांशी चर्चा करून येईल असं मला वाटत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. डी. वाय. पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचे शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करताना पवार बोलत होते.

पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांची भूमिका तीव्र आहे. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ दहा बैठका झाल्या. त्यात तोडगा निघाला नाही. आता चर्चा करायलाही तयार नाहीत. त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जात आहे ते योग्य नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

दरम्यान, मागील महिन्यांपासून कृषी आंदोलन चालू आहे मात्र शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये अनेकवेळा बैठका होऊनही यावर काही तोडगा निघालेला नाही. शेतकरी संघटना मागे हटण्या तयार नाहीत ना केंद्र सरकार त्यामुळे हे आंदोलन आणखी किती दिवस चालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; एलपीजी गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ

“केंद्राला काय करायचं ते करूद्या, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही”

सीताच्या भूमिकेसाठी करीनाने मागितलं होतं ‘इंके’ मानधन, तापसीनं केली बेबोची पाठराखण

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! तरूण शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून बनवलं पेरणी यंत्र

‘मी 10 हजारांची फौज घेऊन येईन, एका फटक्यात सरळ करेन’; शिवसेना आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More