बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ईडी आम्हाला नवीन नाही त्यामुळे देशमुखांवरील कारवाईबाबत आम्हाला यत्किंचितही चिंता नाही”

पुणे | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे अनिल देशमुखांचा पाय खोेलात आहे. या कारवाईवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामध्ये नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ते बोलत होते.

ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख काही पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. त्याची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांच्यावर याआधीही केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी कारवाई केली होती. पण त्यातून त्यांना काय हाती लागलं हे मला माहिती नाही. माझ्यामते काहीही हाती लागलं नाही. त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का?, या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची चिंता करण्याचं आम्हाला काही कारण नाही, असंही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, केंद्रातील सत्ता यांच्या हातात आल्यानंतर हे घडत आहेत. लोक सुद्धा त्यांची गांभीर्याने नोंद घेत नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“देशमुखांवरील कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार, संजय राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत आहेत”

ट्विटरचा झटका! केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक

‘बिग बाॅस 14’ विजेती रुबिना दिलैक शोमध्ये परिधान केलेल्या गाऊनचा करणार लिलाव

अनिल देशमुखांना बार मालकांनी दिले तीन महिने 4 कोटी रूपये; ईडीचा धक्कादायक खुलासा

….म्हणून अभिनेत्री पायल रोहतगीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More