Top News महाराष्ट्र मुंबई

धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेवर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने गंभीर आरोप केले आहेत. मुंडे या प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अशातच या प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिकिया दिली आहे.

धनंजय मुंडेंनी मला सांगितल्यानुसार धनंजय मुंडे यांचे काही व्यक्तींशी संंबंध होते. त्यावरुन मुंडे यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल याची कल्पना मुंडे त्यांना होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेत आदेश प्राप्त करुन घेतला असल्याचं पवार म्हणाले.

पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावे लागतील, कुणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. मुंडे यांनी त्यांची भूमिका वैयक्तिक माझ्यापुढे मांडली आहे. मात्र अशा प्रकरणात निर्णय सर्वानुमते घ्यावे लागतात. त्यामुळे पक्षाच्या प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं पवारांनी सांगितलं.

दरम्यान, हे प्रकरण इथपर्यंत येईल, व्यक्तिगत हल्ले होतील असा अंदाज त्यांना असावा. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात यापूर्वीच आपली भूमिका मांडली असल्याचं पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“मुंडे, मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा”

जावयाच्या चुकीची शिक्षा सासऱ्याला का व्हावी?- जयंत पाटील

बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचं ट्विट; कटुतेवर मात करत….

व्हाॅट्सअपला धक्के सुरुच; ‘या’ बड्या कंपन्यांचा बायबाय; सिग्नलला दिली पसंती

राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, संजय राऊतांचा भाजपला तिळगूळ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या