बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय, खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या- शरद पवार

मुंबई | कोरोनाने आधीच थैमान घातल्यामुळे राज्यात लॉकडाऊन चालू आहे. त्यामुळे सर्वसामान्य अडचणीत सापडला आहे. अशाच प्रकारे आपल्या सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकरीही अडचणीत आला आहे. त्यात रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने त्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती शरद पवारांनी केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.

लॉकडाऊनमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. केंद्राचा हा निर्णय अतिशय धक्कादायक असून तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. याआधी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनीही केंद्राला पत्र लिहित रासायनिक खतांचे वाढलेले दर कमी करावे, अशी मागणी केली होती.

दरम्यान, रासायनिक खतांच्या किंमतीत झालेली वाढ अव्वाच्या सव्वा आहे आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही. बऱ्याच खतांच्या किंमतीत 700 ते 800 रुपयांची वाढ झाली आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी दादा भुसे यांनी केंद्राला केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

बाप लेकीच्या नात्याला काळीमा! लेकीनेच केली बापाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

‘त्या’ प्रकरणात कृष्ण प्रकाश यांच्यावर कुणाचा दबाव?, पिंपरीत जोरदार चर्चा

खंडणी प्रकरणामुळे राष्ट्रवादीने हाकललेल्या मंगलदास बांदलविरोधात नवा गुन्हा दाखल

कडक सॅल्युट! मुलगा कोरोनामुळे रूग्णालयात, वृद्ध आईचा मृत्यु डॉक्टरने केले अंत्यसंस्कार

अभिमानास्पद ! 2 कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More