Top News महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगणाला भेटायला वेळ पण शेतकऱ्यांना नाही”

मुंबई | महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल भेटले आहेत त्यांना अभिनेत्री कंगणा राणावतला भेटण्यसाठी वेळ आहे. मात्र शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे.

केंद्राच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला आहे. या मोर्चाला शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकार आणि राज्याचे राज्यपाल यांच्यावर चौफेर टीका केली.

शेतकरी भेटणार म्हणून राज्यपाल गोव्याला गेले, असं म्हणत पवारांनी राज्यपालांवरही निशाणा साधला. राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. पण त्यांच्याकडे सभ्यता नाही. निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं, असं पवार म्हणाले.

दरम्यान, महाविकासा आघाडीतील नेत्यांनी आझाद मैदानावर उपस्थिती होती. तेव्हा कोण म्हणतं देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही…, “जय किसान, जय जवान, अशी घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केली.

 

थोडक्यात बातम्या-

गायीची जशी पूजा केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा- अबू आझमी

ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही- शरद पवार

नवी मुंबईत गणेश नाईकांना आणखी एक मोठा धक्का!

“कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं, मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?”

“केंद्र सरकारने तयार केलेले कृषी कायदे रद्द होणार नाहीत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या