मुंबई | राजकारणात एक पोकळी असते. तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून पोकळी निर्माण झाली आहे. विरोधाची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न मनसे करत आहे. त्यामुळे ही पोकळी भाजप भरुन काढेल की मनसे हे येणाऱ्या काळात कळणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंबद्दल मतभेद असतील पण आमच्यात सुसंवाद आहे. आजही आमचं बोलणं होत असतं, असंही पवार म्हणाले. ते एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र , माझा व्हिजन’ या कार्याक्रमात बोलत होते. यावेळी पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
राज ठाकरेंना समर्थन देणारा मोठा वर्ग आहे. पण तो प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित होतो का? याबाबत शंका आहे. लोकं फक्त राज ठाकरेंची मते जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात, असंही पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.
दरम्यान, हे सरकार 5 वर्षे चालणार यात मला शंका वाटत नाही. सरकारचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावावर हे अवलंबून असतं. उद्धव ठाकरेंची भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे, असं म्हणत पवारांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला.
ट्रेंडिंग बातम्या-
वाघ आहे का बेडूक; मनसेची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
‘उद्धव ठाकरेंनी आधी CAA कायदा समजून घ्यावा’; काँग्रेस नेत्याचा सल्ला
महत्वाच्या बातम्या-
राज्य 60व्या वर्षात पदार्पण करतंय अन् मी 80 व्या, या वयात आपण थांबायचं…- शरद पवार
वाघ आहे का बेडूक; मनसेची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
‘उद्धव ठाकरेंनी आधी CAA कायदा समजून घ्यावा’; काँग्रेस नेत्याचा सल्ला
Comments are closed.