Top News महाराष्ट्र मुंबई

देशातला सर्वसामान्य माणूस कायदा आणि तुम्हाला दोघांनाही उद्ध्वस्त करणार- शरद पवार

मुंबई | केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा मुंबईत आझाद मैदानावर दाखल झाला आहे. या मोर्चाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आझाद मैदानावर जात मोदी सरकार आणि नव्या कृषी कायद्यांवर टीका केली.

घटनेची पायमल्ली करून हा कायदा आणण्याचा प्रयत्न झाला. संसदीय संकेत उद्ध्वस्त करत बहुमताच्या जोरावर कायदा पास करण्याचा प्रयत्न केला गेला. पण या देशातला सर्वसामान्य माणूस हा कायदा व तुम्ही या दोघांनाही उद्ध्वस्त करेल, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वगळता हमीभाव देण्याचे काम आम्ही केलं होतं. पंजाबच्या शेतकऱ्यांनी संबंध देशाला पुरेल इतका गहू, तांदूळ उत्पादित केला असता तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मालाची 100% खरेदी करण्यास सांगितलं. पण आताचे सरकार खरेदी करायला तयार नसल्याचं शरद पवार म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवरही टीका केली.

दरम्यान,  महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नसल्याचं म्हणत पवारांनी टीका केली.

 

 

थोडक्यात बातम्या-

“मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नाही, काही पक्षांची जाणीवपूर्वक ढोंगबाजी”

“पंजाबचा शेतकरी हा काय पाकिस्तानचा आहे का?, मोदींनी त्यांची साधी चौकशी केली का?”

“महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगणाला भेटायला वेळ पण शेतकऱ्यांना नाही”

गायीची जशी पूजा केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा- अबू आझमी

ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या