बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मोहन भागवतांनी माझ्या ज्ञानात भर घातली’; भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पवारांचा टोला

पुणे |  आम्ही प्रत्येक भारतीयाला हिंदू मानतो. इथे दुसऱ्यांच्या मताचा अनादर होणार नाही. हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते आणि आपण सर्व हिंदूच आहोत, असं आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. मोहन भागवतांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसरर्वा शरद पवार यांनी भागवत यांना टोला हाणला आहे.

शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना, चांगली गोष्ट आहे की भागवत सर्व धर्म एक समजतात. दोन्ही समाजाचं मुळ एका कुटुंबातून झाला ही नवीन गोष्ट समजली आणि माझ्याही ज्ञानात भर पडली, असंं म्हणत शरद पवारांनी भागवतांवर निशाणा साधला.

मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांच्यावर टीका केली. सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसने मांडली आहे. रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्याचं स्वागत केलं असतं, असं नाना म्हणाले.

दरम्यान, मोहन भागवत हे कुठले डॉक्टर आहेत हे तपासावं लागेल. संविधानामध्ये समभावाची भावना विशद करण्यात आली आहे, असंही नाना म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

बिकिनी घालून महिला पोहोचली विमानतळावर; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

महात्मा गांधींच्या टोपीवरून नवा वाद; भाजप नेत्याने केला ‘हा’ दावा

माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्सही घ्यावेत- शाहरुख खान

“मोहन भागवत कुठले डाॅक्टर हे तपासावं लागेल”

“कोरोना महाराष्ट्र सरकारचा व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More