बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परदेशात जायला वेळ पण…’; शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन चालू आहे. या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जवळजवळ 100 दिवस पुर्ण झाले आहेत मात्र अद्यापही यावर केंद्र सरकारने काही तोडगा काढलेला नाही. पंतप्रधान मोदींनी या कायद्यांनी शेतकऱ्याला फायदा होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र शेतकरी आपलं आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत.

या सगळ्यात मोदींनी दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला भेट दिली नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर आणि भाजपवर टीका केली आहे. रांची येथील हरमू मैदानातील सभेत बोलताना शरद पवारांनी टीका केली आहे.

भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर देशात जातीयद्वेषाचं विष वाढत आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत, पंतप्रधानांकडे परदेशात जायला वेळ आहे, पश्चिम बंगालला जाण्यासाठी वेळ आहे मात्र 20 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांची भेट घ्यायला त्यांच्याकडे वेळ नसल्याचं म्हणत पवारांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, बंधूभाव प्रस्थापित करणं ही केंद्राची जबाबदारी आहे. मात्र भाजप देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे. शेतकरी 100 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही. त्यासोबतच पंतप्रधानांना कोलकाताला जायला आणि पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे, असा उपरोधिक टोला शरद पवारांनी लगावला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

काय सांगता! खेकडा चक्क सिगरेट ओढतोय; ‘हा’ व्हिडीओ पाहून सारं जग झालंय थक्क

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात नियमांना धाब्यावर बसवुन चित्रपटाचं शूटिंग; मनसेचे गंभीर आरोप

‘दिल्लीला कसं विसरु तुम्हीच सांगा’; किंग खान ‘या’ कारणामुळं झालाय भावुक

अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ; रिलायन्स होम फायनान्स डिफॉल्टर यादीत

“काँग्रेसनं कर्नाटकला IT Hub बनवलं, भाजप कर्नाटकला Porn Hub बनवतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More