Top News पुणे महाराष्ट्र

सहा वर्षे सत्तेत असूनही चुका दुरुस्त करता आल्या नाहीत का?- शरद पवार

Photo Credit- Facebook/ Sharad Pawar & Narendra Modi

पुणे | सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या भावाने शंभरी गाठली आहे त्यामुळे सामान्य नागरिकांंच्या मनातही सरकारच्या विरोधात रोष तयार झाला आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंधन दरवाढ मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारमध्ये सहा वर्षे सत्तेत असताना देखील चुका दुरुस्त करता येत नसतील तर त्यावर चर्चा काय करायची, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला हाणला आहे. याआधी नरेंद्र मोदींनी यावर युपीए सरकारच्या काळातील धोरणांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा आरोप मोदींनी केला होता. तर विरोधी पक्षानेही यावरून केंद्र सरकारवर टीका केली होती.

केंद्रात गेली सहा वर्षे तुमची सत्ता असतानासुद्धा तुम्हाला चुका दुरूस्त करता येत नसेल तर त्यावर चर्चा काय करायची, असं पवार म्हणाले. तर याआधी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीगही इधन दरवाढीवरून सरकारवर टीका केली. ज्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार नाहीत. तो दिवस अच्छा दिन म्हणून घोषित करा, अशी उपरोधित टीका प्रियंका गांधींनी केली.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीला यूपीए सरकारचं त्यावेळचं धोरण कारणीभूत असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांना सवाल करण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणं महत्वाचं- रिंकू राजगुरू

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी, लिहून द्या नाहीतर…

अहमदनगर जिल्ह्यातील नेत्यांना सेटलमेंटची सवय लागली आहे- सुजय विखे

पेट्रोल, डिझेल दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या…

“शिवाजी महाराज होणे शक्य नाही पण सव्वाशे कोटी देशवासी ‘सेवाजी’ बनू शकतात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या