पुणे महाराष्ट्र

नारायण राणे विनोद करतात, हे मला माहीत नव्हतं- शरद पवार

पुणे | अमित शहा यांच्या पायगुणामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावं आणि चांगलं सरकार यावं, भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राणेंना टोला लगावला आहे.

नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावं. त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी शेतकरी आंदोलनावरही आपलं मत व्यक्त केलं होतं.

शेतकरी आंदोलनाचे गांभीर्य केंद्र सरकारला कळायला हवं. शेतकऱ्यांची अस्वस्था पाहून केंद्र सरकार मधील वरिष्ठ मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालयला हवं होतं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांशी चर्चा करणारे रेल्वे मंत्री पीयूष गोयल काही कृषि तज्ज्ञ नाहीत. गोयल माझे चांगले मित्र आहेत. मात्र ते शेतीतज्ज्ञ आहेत, हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली, असा टोलाही पवारांनी लगावला.

थोडक्यात बातम्या-

“राणेंसारख्या नेत्यांना कसं सांभाळायचं आम्हाला माहीत, त्यांच्यावर अन्याय होणार नाही”

मुंबई पोलिसांकडून या बड्या अभिनेत्रीला अटक, कारण आहे अत्यंत धक्कादायक

“अमित शहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी”

राणे महाराष्ट्राचे दबंग नेते, झोप विसरून मेहनत करतात- देवेंद्र फडणवीस

“सत्तेत असलेला मराठा समाज गरीब मराठ्यांची पोरगी करत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या