बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम”

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चकमक पाहायला मिळाली. पोलिसांनीही लाठीचार केला त्यामुळे वातावरण आखीनच तापलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

बळाचा वापर करून जर आंदोलन चिरडले तर त्याचे परिणाम गंभीर होतील. कारण आपण अशांत पंजाब पाहिला आहे, तसे पुन्हा घडू देण्याचे पातक मोदी सरकारने करू नये, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शानं धुमसणारा पंजाब पाहिला आहे, तीच परिस्थिती आता पुन्हा उदभवू देवू नका असा इशाराच त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकरी आणि ट्रॅक्टरचा सहभाग असणार याची अपेक्षा असूनही चर्चा करून या गोष्टी वेळीच थांबवता आल्या असत्या. पण तसं काहीही झालं नसल्याचं पवार म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-

काँग्रेस सूडाच्या भावनेतून शेतकऱ्यांच्या आडून हिंसाचार घडवत आहे- सुधीर मुनगंटीवार

आंदोलन भडकावल्याचा आरोप असलेला दीप सिद्धू आणि भाजपचा संबंध काय?

प्रियकर-प्रेयसीचं नको ते सुरु होतं, तेवढ्यात नवऱ्यानं ठोठावलं दार; घडला धक्कादायक प्रकार

“हा माणूस राजकारणामुळे हिंसेचे समर्थन करत आहे”

शेतकऱ्यांच्या लाठीचारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरून घेतल्या उड्या, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More