बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला म्हणणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचं प्रत्युत्तर म्हणाले….

मुंबई | राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला असं म्हणत मनसे नेते राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज ठाकरे यांच्यावर न बोललेलं बरं, त्यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचा मुद्दा मोठा झाला. आज मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे. मी हे आधीच सांगितलं होतं की असलं काही होणार नाही. मराठा समाजाचं आरक्षण सर्वांनाच मान्य आहे तर अडचण काय आहे, हे मी आधीही म्हटलं असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि नवाब मलिक यांनीही टीका केली होती. राष्ट्रवादी पक्ष फुले-शाहु आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहित नसावं. नाहीकर त्यांना जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणावरून फसवणूक केल्याचा आरोप शरद पवार यांनी बोलताना केला आहे. घटना दुरूस्तीने ओबीसी वाल्यांना काहीच मिळणार नसल्याचंही पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मुंबईकरांना दिलासा! आता ‘या’ कोरोना नियमांमध्ये होणार शिथिलता

अफगाणिस्तानमधील एअरलिफ्ट लांबणीवर; हवाई हद्द केली बंद

मी जेवढ्या उंचीची तेवढी लायकी ठेवा नाहीतर मला भेटायला यायचं नाही- पंकजा मुंडे

“महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या तरी ठाकरे सरकारची तक्रार आहेच”

‘त्यांनी आमचे हात बांधून…’; अफगाणिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More