बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना विश्वास असणारा पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्दही पाळला होता”

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अन्य राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शरद पवारांनी कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचं कौतूक केलं.

शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही. परंतु महाराष्ट्रात शिवसेनेला अनेक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच असल्याचं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी हे सांगतावा शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.

जेव्हा जनता पक्षाचं राज्य आलं आणि काँग्रेसचा पराभव झाला त्यावेळी काँग्रेसला पाठींबा देण्यासाठी शिवसेना हाच पक्ष पुढे आला. त्यांनी इंदिरा गांधी यांना मदत करण्यासाठी विधानसभा निवडणुकांमध्ये एकही उमेदवार उभा करणार नसल्याचा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो याचा तुन्ही विचार करा. पण बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची कधीही चिंता केली नाही. त्यांनी इंदिरा गांधी यांना दिलेला शब्द निवडणुका न लढवता पाळला, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, असं लोकांना कधीच वाटलं नव्हतं. पण आपण एकत्र आलो. पर्याय दिला. लोकांनी हा पर्याय स्वीकारला असून आपली यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. कुणी काही म्हणो, सरकारची वाटचाल दमदार सुरू आहे, असं शरद पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

15 लाखापेक्षा जास्त पाहिले गेले ‘या’ तरूणीचे तांडव नृत्य; पाहा अंगावर रोमांच आणणारा व्हिडीओ

“चंद्रकांत पाटील आपल्या मतावर ठाम नसतात, त्यांची मतं रोज बदलतात”

अजब प्रकार! कोरोना लस घेतल्यानंतर नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या वस्तू अन्…..

ऑनड्यूटी रोमँटिक व्हिडीओ बनवणं पोलीस जोडप्याला पडलं महागात, पाहा व्हिडीओ

देशात एका दिवसात सर्वाधिक मृतांची नोंद; नव्या बाधितांची संख्या 1 लाखांच्या आत

कावी लागली आवडती बाईक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More