Top News पुणे महाराष्ट्र

लोकांसाठी झटणाऱ्यांना जनता कधीही विसरत नाही- शरद पवार

पुणे | समाजातील शेवटच्या माणसापर्यंत बांधिलकी बाळगा. लोकांसाठी झटा. लोकांसाठी झटल्यास तेही तुम्हाला कधीच विसरत नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात बोलत होते.

वारजेमधील शरद पवरांच्या हस्ते 45 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी पवारांनी खडकवासला परिसरातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

खडकवासलातील प्रत्येक गावात स्थानिक नेतृत्व असायचं. गावात एकोपा होता. गाव कुटुंबासारखं राहायचं. आता गावामध्ये आलो तर कुठे आलो हे कळत नाही. शेती उद्ध्वस्त झाली, सोसायट्या आल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक इथे येऊन राहत आहेत, असं सांगतानाच आता गावातील तरुण गावाच्या विकासासाठी पुढे येत आहेत ही आनंदाची गोष्ट असल्याचं शरद पवार म्हणाले.

खडकवासला परिसरात मला एकेकाळी प्रचंड मते मिळायची. माझ्याकडे तेव्हा राज्याची आणि राज्याबाहेरची जबाबदारी असायची. त्यामुळे खडकवासला परिसरात प्रचाराला यायला वेळ मिळायचा नाही. मात्र दोन तास जरी मी प्रचार केला तरी विक्रमी मते मिळत असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

ब्राझीलच्या राष्ट्रपतींना आठवली संजीवनी; हनुमानाचा फोटो शेअर करत मानले मोदींचे आभार

खळबळजनक! चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; शुटरची जाहीर कबुली

क्रिकेटमध्ये सेक्स स्कँडल?; 20 वर्षीय क्रिकेटपटूला रंगेहाथ पकडल्यानं खळबळ

“झाडाचं पान का पडलं म्हणूनही भाजप आंदोलन करू शकतं त्यामुळे आम्ही फारसं लक्ष देत नाही”

शाळा सुरु होण्याची तारिख बदलली; आता ‘या’ तारखेला भरणार वर्ग!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या