नाशिक महाराष्ट्र

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये- शरद पवार

नाशिक | कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये. कांद्याबाबतचे बहुतेक निर्णय हे केंद्र सरकारच्या हातात असतात, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.

राज्यात कांदा व्यापाऱ्यांवर केंद्राच्या सांगण्यावरून धाडी टाकण्यात येत आहेत. राज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

कांद्याचा थोडा भाव वाढला की इन्कम टॅक्सवाल्यांच्या काही गोष्टी ऐकू येतात, मार्केट चालू ठेवा, अडचणी एकत्र बसून सोडवू, तुम्हाला त्रास झाला म्हणून उत्पादकाला त्रास व्हावा अशी तुमची भावना नाही. त्यामुळे थोडं नमतं घ्या, असा सल्लाही पवारांनी कांद्याच्या व्यापाऱ्यांना दिला आहे.

स्टॉक लिमिट प्रश्नासंदर्भात आज मी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच रामदासा…’; आठवलेंना गृहमंत्र्यांकडून ‘आठवले पॅर्टन’ सदिच्छा

राज्यपालल कोट्यातील एक जागा देण्याचं तीन महिन्यापूर्वी ठरलं होतं, पण आता…- राजू शेट्टी

आता कुमार सानूची ‘जान वाचणं’ कठीण आहे!- शालिनी ठाकरे 

‘भाजपची भूमिका डबल ढोलकी’; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं भाजपला प्रत्युत्तर

‘हा त्याच एका कटकारस्थानाचा भाग आहे’; मराठा आरक्षणावरून पाटलांचा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या