बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा… त्यामुळे कधीच संपला नाही अन् संपणार नाही- शरद पवार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिवसाचे औचित्य साधत मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्ते, नेते तसंच पक्षाच्या असंख्य हितचिंतकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाची इथून पाठीमागची वाटचाल आणि आता कोरोनाच्या संकटानंतर बदललेल्या जीवनशैलीनुसार पक्षाला करावयाचे आवश्यक बदल विस्ताराने नमूद केले. पण या सगळ्यामध्ये त्यांनी पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देत राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे त्यामुळे कधी संपणार संपला नाही अन् कधी संपणार देखील नाही, असं ठणकावून सांगितलं.

मध्यंतरी ज्यांना पक्षाने भरपूर दिलं त्यातले कित्येक जण सत्तेच्या लोभाने किंवा त्यांच्या संस्थांना संरक्षित करण्यासाठी आपली साथ सोडून गेले. परंतु, त्यावेळी एक वेगळंच सत्य समोर आलं. नेत्यांनी जरी पक्ष सोडला तरी तळागाळातला आपला कार्यकर्ता अजिबात विचलीत झाला नाही. त्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेत्यांपर्यंत, अगदी माझ्यापर्यंत आम्ही पक्षाच्या पाठीशी भक्कमपण राहू अशा भावना कळवल्या. आज मी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असं पवार म्हणाले.

या टप्प्यावर पोहचल्यानंतर साहाजिकच स्थापनेपासूनच्या काळातील पक्षाला मिळालेल्या जनाधाराबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची ही वेळ आहे. आपण ह्या काळात अनेक निवडणुकांना सामोरे गेलो. पण यशाने हुरळून न जाणे व अपयशाने खचून न जाणे ही पक्षाची शिकवण आपण इमानदारीने अमलात आणली. काही वेळा तर आपला पक्ष आता संपूर्ण लयाला जाईल अशी भाकितेही वर्तवली गेली. पण आपण त्या सगळ्यांना पुरुन उरलो. एवढेच नव्हे, तर फिनीक्स पक्षाप्रमाणे आपण पुन्हा एकदा गगनभरारी घेतली. तुमच्या सगळ्यांची मेहनत, जिद्द आणि बांधिलकी याचीच जणू काही परीक्षा पाहिली गेली. मला समाधान या गोष्टीचे आहे की, या परीक्षेत पक्ष उत्तमरित्या यशस्वी झाला, अशा भावना त्यांनी पवार यांनी व्यक्त केल्या.

आज आपल्या पक्षाची सर्वसामान्यांसाठीची बांधिलकी जपणारा, गोरगरीबांसाठी संघर्ष करणारा, सामाजिक संतुलनासाठी आग्रही असणारा अशी प्रतिमा तयार झाली आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. यंदा स्थापना दिनी आपण गेल्या काही महिन्यांपासून अवघ्या जगाला उद्धवस्त करणाऱ्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहोत. जगभरात या कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. तर या संकटाच्या काळात पक्षाच्या शिकवणीप्रमाणे आपण सगळ्यांना मदतीची भूमिका घ्यायची आहे, अशी सूचना पवार यांनी केली.

ट्रेंडिंग बातम्या-

‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ सचिन वाझे 16 वर्षांनंतर पुन्हा पोलिसात दाखल, इथं आहे नेमणूक!

….म्हणून मला शिवभक्तांचा सार्थ अभिमान, त्यांच्या समोर मी नतमस्तक- छत्रपती संभाजीराजे

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले? तुमच्या भागात किती रुग्ण? वाचा सर्व माहिती

कोरोनापासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की करा; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना

आम्हाला फक्त विदुषक हवाय; शरद पवारांचा ‘या’ नेत्याला टोला

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More