नाणार प्रकल्पासाठी शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन, म्हणतात…
मुंबई | नाणार प्रकल्पावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये नाणार प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. पत्र मिळाल्यानंतर शरद पवारांनी राज ठाकरेंशी फोनवर याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.
शरद पवार यांनी नाणार प्रकल्पाबाबत आपल्या भूमिकेचं समर्थन केल्याची माहिती राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर जमलेल्या नाणार प्रकल्प समर्थकांना दिल्याचं कळतंय.
नाणार प्रकल्प समर्थकांनी सोमवारी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आमचं हे एक काम तेवढे मार्गी लावा. आम्ही तुमचे काय ऋणी राहू, अशी भावना व्यक्त केली.
दरम्यान, राज्यात, देशात गुंतवणूक यावी ह्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. मध्यंतरी एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प बेंगळुरूत गेला आणि तो महाराष्ट्रात परत यावा ह्यासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड सुरु आहे हे मी वाचलं. ही बातमी क्लेशदायक होती. आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये, असं मत राज ठाकरेंनी पत्रातून मांडलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“कोरोना लसीत गाय आणि डुकराची चरबी, आमचा धर्म भ्रष्ट होईल”
सावळ्या रंगाच्या त्रासाला कंटाळून तरूणाने उचललं हे धक्कादायक पाऊल
राफेलचे मालक, फ्रान्सचे अब्जाधीश ओलिवियर दसॉल्ट यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
महिलांनी कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही- राज ठाकरे
नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांना मिळणार एवढी सूट; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
Comments are closed.