Sharad Pawar | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2024 पार पडला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनांची घोषणा केली. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना सर्वाधिक योजना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल झाला असून महाविकास आघाडीचं राज्यात पारडं जड असल्याचं दिसून आलं. अशातच आता विधानसभा निवडणूक ही काही महिन्यांवर आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांचा पाऊस होताना दिसत आहे. यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) अर्थसंकल्पाचा हिशोब मांडला आहे.
“अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा फुलोरा”
प्रत्यक्षात येणार नसल्याच्या तरतुदी या अर्थव्यवस्थेत मांडल्या असल्याचं शरद पवार म्हणत आहेत. महसूल तूट, एकंदर लागणारी आवश्यकता, या तीन गोष्टींची आकडेवारी पाहिल्यास अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी तरतूद असल्याचं दिसून येतं. हा अर्थसंकल्प आपण काही तरी भयंकर करत आहोत असं दाखवणारा आहे. मला खात्री आहे की लोकांना यावर विश्वास बसणार नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.
आगामी विधानसभा तोंडावर आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुती ढासळल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात योजनांचा भडीमार केला आहे. मात्र या योजना आणि तरतूदी सत्यात साकार होणार नसल्याचं शरद पवारांचं (Sharad Pawar) म्हणणं आहे.
एखाद्या गोष्टीला 100 रूपये खर्च आहे. मात्र माझ्या खिशात केवळ 70 रूपये खर्च आहे तर खर्च कसा करणार? असं म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) सवाल केला आहे. तुमच्याकडे महसूली खर्च किती आहे? तुमच्याकडे महसूली खर्च किती झाला? आवश्यकतेहून जास्त खर्चाचा गॅप कसा भरणार हे न सांगताच करू या म्हणण्याला फारसा अर्थ उरत नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्षरित्या भूमिका स्पष्ट केली होती. त्यावर शरद पवारांनी आमची आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचं शरद पवारांनी सुनावलं आहे. एका व्यक्तीने नाहीतर आघाडीतील सर्व नेते एकत्रित निर्णय घेत असल्याचं ते म्हणाले आहेत.
शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं
तसेच ते बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींनी सभा घेतल्या होत्या. त्यानंतर आताही मोदींनी सभा घ्याव्यात. जिथे मोदींनी सभा घेतल्या होत्या. तिथे महाविकास आघाडीला यश मिळालं होतं. त्यामुळे आता मोदींनी आणखी सभा घ्याव्यात, असं शरद पवार म्हणाले आहेत.
News Title – Sharad Pawar Taunt On Maharashtra Budget 2024
महत्त्वाच्या बातम्या
एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल; ‘या’ दिवसापासून द्यावे लागणार जास्त पैसे
1 जुलैनंतर सिम पोर्ट करणे होणार अत्यंत अवघड, अन्यथा बसू शकतो लाखोंचा दंड
या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात यश मिळणार
Diabetes रुग्णांसाठी जांभूळ एक वरदानच; जाणून घ्या याचे फायदे
“थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प, दिलेलं आश्वासन पूर्ण करू”