“निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार मी येणारच्या घोषणा दिल्या आता मात्र…”
पुणे | राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या धार्मिक भावना भडकवून द्वेष निर्माण केला जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे.
काही धार्मिक कार्यक्रम करायचे असतील तर घरी करावे. दुसऱ्याच्या घरासमोर जाऊन करण्याचा आग्रह धरू नये, असा सल्ला शरद पवारांनी दिला. तर हल्ली वातावरण बिघडलं आहे. मुख्यमंत्री व्यक्ती नव्हे तर संस्था असते. त्याचा यथोचित सन्मान राखला पाहिजे. त्यांचा एकेरी उल्लेख करू नये, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार मी येणारच्या घोषणा दिल्या. मात्र, आता सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ झालेत, असा खोचक टोला शरद पवारांनी देेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व भाजपला (BJP) उद्देशून लगावला आहे. सत्ता येते आणि जाते त्यामुळे आपण इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाही, असा सल्लाही पवारांनी दिला आहे.
दरम्यान, धार्मिक भावना स्वत:पुरत्याच मर्यादित ठेवा, अशा शब्दात शरद पवारांनी सुनावलं आहे. तर राष्ट्रपती राजवटीबद्दल बोलताना, या चर्चा केल्या जातात पण याचा काही फायदा होत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
“…तर लोक या महाराष्ट्रद्रोह्यांना जागोजागी चपला मारतील”
‘या’ खास कारणामुळे ट्विटरवर ट्रेंड होतोय शाहरूखचा मन्नत बंगला
महाराष्ट्रावर दुहेरी संकट, हा आठवडा महत्त्वाचा
‘राष्ट्रपती राजवट लावा…’; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
Comments are closed.