बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी काही इतक्या लवकर जात नाही’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कर्करोग (Cancer) झाला होता. 2004 साली त्यांच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना, तुमच्याजवळ फक्त सहा महिने असल्याचे सांगत मृत्यूची पूर्वकल्पना दिली होती. डॉक्टरांचा अंदाज खोटा ठरला. आता 2022 साली सुद्धा शरद पवार राजकारणात सक्रिय आहेत. 2004 साली आजरापणात डॉक्टरसोबतच्या संभाषणाचा एक किस्सा त्यांनी सांगितला.

2004 साली माझे कर्करोगाचे निदान झाले होते. यावेळी एक डॉक्टर माझ्यावर उपचार करत होता. तेव्हा मी त्याला विचारले, तुला माझ्याकडे बघून काय वाटते, मला काय झाले असेल? यावर ते म्हणाले, खरं सांगू का, मोठे डॉक्टर तुम्हाला खरे सांगत नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो. तुमची काही कामे राहिली असतील, तर ती करुन घ्या. तुमच्याकडे आता फक्त सहा महिन्यांचे आयुष्य आहे, असे पवार म्हणाले.

त्यावर मी त्याला म्हणालो. पैज लाव, मी इतक्या लवकर जात नाही. पुढे हसत मी त्याला म्हणालो, अगदीच जर तु म्हणत असशील तर, तुला पोहोचवल्यावरच मी जाईन. त्यामुळे तु माझ्याबद्दल असा काही उल्लेख करु नको. त्यावेळी 2004 साल होते आणि आता 2022 आहे. आणि मी अजून जिवंत आहे, असे शरद पवार म्हणाले. पवार मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

शरद पवार हे देशातील ज्येष्ठ राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांनी गेली 70 वर्षे राजकारणात घालवली आहेत. महाराष्ट्रात, महाविकास आघाडी सरकारचे ते शिल्पकार होते. आजही पवार आठवड्यातून 4 दिवस राजकीय दौरे करतात. त्यांच्या अंगात 25 वर्षाच्या तरुणासारखा उत्साह असतो.

थोडक्यात बातम्या – 

गाडीच्या हॉर्नच्या आवाजावर तरूणांनी केला नागीन डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा खेळ आता वेब सिरीजमध्ये दिसणार; “मी पुन्हा येईन” चा टीझर प्रदर्शित

खासदारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?, राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती

टाटांचं टेन्शन वाढणार; महिंद्राच्या 4 जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लवकर बाजारात येणार

खुशखबर! 10 वी पास तरुणांना पोस्टात नोकरीची संधी; तब्बल इतक्या पदांसाठी भरती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More