“…त्यावेळी गुलाम नबींना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, मात्र…”; पवारांनी सांगितला ‘तो’ खास किस्सा
नवी दिल्ली | काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासह आज चार खासदार निवृत्त झाले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्याशी असलेल्या व्यक्तीगत मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.
आठवणींना उजाळा देत असताना शरद पवार यांनी एक खास किस्सा सांगितला आहे. लोकसभा निवडणुकीत गुलाम नबी आझाद यांना पराभूत करण्यात आपण कसं अपयशी ठरलो? याबाबतचा हा किस्सा आहे.
महाराष्ट्रातील वाशिमसारख्या मागास भागातून निवडणूक लढवण्याची त्या काळी कोणी हिंमत करायचं नाही. मात्र आझाद यांनी हिंमत दाखवत निवडणूक लढली. त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो. आम्ही ठरवलं की काहीही झालं तरी आझाद यांना वियजी होऊ द्यायचं नाही. त्यांना पाडायचा आम्ही प्रयत्न देखील केला. पण तरीही आझाद यांनी प्रचंड मताधिक्यानं विजय मिळवला, असं शरद पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यसभेत गुलाम नबी आझाद, शमशेर सिंह, मीर मोहम्मद फैयाज, नादिर अहमद हे सदस्य निवृत्त होत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनीही या नेत्यांच्या कार्याचा आढावा घेतला. मोदी यावेळी भावुक झालेले पहायला मिळालं.
पाहा व्हिडीओ-
थोडक्यात बातम्या-
‘त्या’ आत्महत्या केलेल्या तरुणीचे मंत्र्यासोबत प्रेमसंबंध?; पोलीस काय म्हणाले???
सरकार शोधतंय स्वयंसेवक करावी लागणार ‘ही’ कामं
‘या’ कारणामुळं अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी
आठवड्यात तीन सुट्ट्या?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
“दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले, सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले”
Comments are closed.