Sharad Pawar l राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धा येथील हिंगणघाटमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत शेतकरी कर्जमाफीचा जुना किस्सा सांगितला आहे. त्यामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी तो चर्चेचा विषय बनत आहे. तर आता जाणून घेऊयात तो किस्सा नेमका काय आहे.
शरद पवारांनी सांगितला कर्जमुक्तीचा जुना किस्सा :
यावेळी शरद पवार यांनी सांगितले की, शेतकरी वर्ग देशातील अन्नाची गरज भागवू शकतो. परंतु सध्या शेतकरी आत्महत्येचा प्रश्न निर्माण होत आहे. कारण कापूस व सोयाबीनचे दर हे पडले होते. परंतु त्या दरम्यान मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देखील दिला होता. तसेच त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची दुःखद बातमी आली होती.
मात्र त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग हे होते. त्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे किती आवश्यक आहे हे सांगितले. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी एका झटक्यात शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपये कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असल्याचा किस्सा शरद पवार यांनी सभेत सांगितला.
Sharad Pawar l शरद पवार नेमकं काय म्हणाले :
आता विधानसभेची निवडणूक ही लोकांचे प्रश्न सोडवणूक करण्यासाठीची आहे. तसेच सहा महिन्यांपूर्वी लोकसभेची देखील निवडणूक झाली आहे. तेव्हा वर्धा येथे आमचा उमेदवार निवडून देण्याचे काम जनतेने केले आहे. मात्र त्यावेळीचं देशात सत्ता बदलेल अशी आमची अपेक्षा होती.
कारण देशाने गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे काम पाहिले. त्यामुळे मोदी यांनी या दहा वर्षांच्या काळात लोकांचे प्रश्न देखील सोडवले नाही. परंतु आज पुन्हा त्यांच्या हातात सत्ता गेलेली आहे. पण सध्याची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे लोकांनी त्यांना मतदान केले. पण ते स्वत:च्या ताकदीवर सत्तेत येऊ शकले नाही असं शरद पवार म्हणाले आहेत.
News Title : Sharad Pawar told the story of loan waiver
महत्वाच्या बातम्या –
4 दिवसात सोयाबीनला हवा तसा भाव देणार, भाजपच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य
फॉर्म भरुनही पैसे आले नाही त्यांच्यासाठी मोठी अपडेट समोर!
नरेंद्र मोदी महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार?
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा
‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नको त्या गोष्टी माझ्या तोंडी..”