शरद पवारांनी सांगितली रणनीती, उमेदवार ठरवण्याचा अधिकार फक्त ‘त्या’ तिघांना

Sharad Pawar | महाविकास आघाडीत जागा वाटपाविषयी काय फॉर्म्युला आहे, याची कार्यकर्त्यांमध्ये जितकी उत्सुकता आहे, तितकीच ती सत्ताधाऱ्यांना पण आहे. निवडणुकीतील रणनीती काय असेल यावर खलबतं सुरू आहेत. अशात शरद पवार (Sharad Pawar) यांनी रणनीती सांगितली.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आम्ही तीन जणांची समिती स्थापन केली आहे. उमेदवार ठरवण्याचा अधिकार फक्त तिघांना असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे.

उमेदवार ठरवण्याचा अधिकार फक्त ‘त्या’ तिघांना

योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आम्ही तीन लोकांची कमिटी केली आहे. जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊत या तीन नेत्यांना निर्णय घेण्याचा, शिफारस करण्याचे अधिकार दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात जाऊन ही समिती सर्व्हे करणार आहे, असंही शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितलं.

जे लोक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याबाबतचा लोकांचा कल जाणून घेणार आहेत. जो ओरिजिनल इच्छुक आहे, त्याला काही विचारलं जाणार नाही. तर गावातील सामान्य लोकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. तसेच दूध संस्था, सहकारी संस्था आणि इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊनच उमेदवार ठरवला जाणार आहे, अशी माहिती शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे.

Sharad Pawar | “15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल”

गेल्या दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आली. त्यांनी राजकीय पक्षांशी चर्चा केली. माझा अंदाज आहे की 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. त्या दिवसांपासून आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर अर्ज स्वीकारले जातील. साधारण 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

पवारांच्या तुतारीला पिपाणीमुळे फटका, चिन्हाबाबत कोणता निर्णय घेणार?

मारुतीची सर्वात स्वस्त कार ‘या’ दिवशी होणार लाँच

महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांने निवडणूक आयोगाने केल्या ‘या’ मागण्या!

“म्हणून आम्ही भाड्याच्या घरात राहतो”, विद्या बालनच्या वक्तव्याची सगळीकडे एकच चर्चा

‘या’ अभिनेत्रीमुळे रणबीर-कॅटरिनाचं लग्न मोडलं?, सोशल मीडियावर दोघांचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल!