Loading...

पवारांच्या ताफ्यातील गाडीने दिली दुचाकीस्वाराला धडक

नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात असताना शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीने एका बाईकला धडक दिली. या अपघातात बाईकस्वार जखमी झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी येथून खापाकडे जात असताना जामगाव येथे हा अपघात झाला.

शरद पवारांच्याच ताफ्यातील गाडीने या जखमी बाईकस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या बाईकस्वारावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

Loading...

राज्यातील बहुतांश भागात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच शेतकऱ्यांच्या शेताची, पिकांची पाहणी करण्यासाठी शरद पवार दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी शरद पवार हे सकाळीच नागपूर येथे पोहोचले आहेत.

नागपूर येथे पोहोचल्यानंतर शरद पवारांनी काटोल विधानसभा क्षेत्रातील ओल्या दुष्काळाच्या पाहणी दौऱ्यात चारगाव येथील शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी सरकारकडून कुठल्या प्रकारची मदत मिळाली नाही आणि कोणी पाहणी करायला सुद्धा आले नाही अशा व्यथा अनेक शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...