बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार-विश्वास नांगरे पाटलांच्या भेटीनं चर्चांना उधाण; ‘या’ विषयावर झाली चर्चा?

मुंबई | नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. या अधिवेशनात माजी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. तर पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचं बदली करण्यात आली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं सापडल्याने मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा पेच निर्माण झाला आहे. हाच पेच सोडवण्यासाठी आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांना या प्रकरणाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिस दलाच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. राजकीय सत्ताकेंद्र राहिलेल्या ‘सिल्वर ओक’वर ही बैठक पार पडली. अर्धा तास चाललेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळत आहे, त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास नांगरे पाटील यांच्याकडे देण्यात येईल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सचिन वाझे, मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर या प्रकरणांची सविस्तर माहिती पवारांनी घेतली. त्याचबरोबर पुढील कारवाई करण्याबाबत चर्चा देखील झाली असल्याचं कळत आहे. काल अधिवेशनात सचिन वाझे यांच्या निलंबनाविषयी गृहमंत्री अनिल देशमुख यांची शरद पवारांसोबत यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विकासाचे मुद्दे सोडून आत्महत्या प्रकरणेच जास्त गाजली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मनसूख हिरेन कथित आत्महत्या प्रकरण आणि मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण या तीनही प्रकरणामुळं सरकारला या अधिवेशनात दोन पावलं मागं टाकावी लागली होती. त्यामुळे सरकार आता या प्रकरणी काळजीपूर्वक निर्णय घेत असल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

ममता बॅनर्जींच्या पायाला गंभीर दुखापत; तर प्रशांत किशोर सोशल मीडियात ट्रेंडमध्ये

आमदार निधीत एवढ्या कोटींची वाढ; अजित पवारांची मोठी घोषणा!

महाराष्ट्रातील ‘या’ शहरांची चिंता वाढली; आजपासून कठोर निर्बंध

धक्कादायक! रागाच्या भरात डिलिव्हरी बॉयनं फोडलं तरुणीचं नाक, कारण ऐकून तुम्हाही व्हाल हैराण

राज्यात कोरोनाचा उद्रेक; आजची आकडेवारीही अत्यंत धक्कादायक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More