Sharad Pawar | राष्ट्रवादीचे प्रमुख (शरद पवार गट) शरद पवार यांनी आज (21 डिसेंबर) मस्साजोग गावी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी देखील संवाद साधला. खासदार निलेश लंके , आमदार संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे यांची देखील यावेळी उपस्थित होती. पवारांनी (Sharad Pawar ) देशमुख कुटुंबाची भेट घेत त्यांच्या सर्व अडचणी समजून घेतल्या.
यावेळी पवार भावूक दिसून आले. त्यांनी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. यावरून शरद पवार यांनी अप्रत्यक्ष फडणवीस यांना टोला लगावला. “सरकारकडून कितीही पैसे देण्यात आले तरी गेलेला माणूस परत येत नाही. कुटुंबाचे दुःख फार मोठे आहे. हे दुःख कधी कमी होणार नाही”,असं शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
“जे घडले आहे त्याने सर्वसामान्य लोकांना धक्का बसलाय. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणार लोक इथे आहेत. अशा जिल्ह्यात जे घडले ते कुणाला ही न पटणारे आहे. सरपंचाची हत्या झाली. जे घडले ज्यात काहीच संबंध नसताना यांची हत्या झाली. हे चित्र अतिषय गंभीर आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी.”, असंही पुढे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, शरद पवार गटाकडूनही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाणार आहे. देशमुख यांच्या कन्या वैभवी देखमुख यांच्या शिक्षणाचा खर्च शरद पवार उचलणार आहेत. याबाबत त्यांनी स्वत: घोषणा केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची जबाबदारी शरद पवार यांनी स्वीकारली. पवारांसमोर (Sharad Pawar ) देशमुख कुटुंबाने यावेळी आपल्या व्यथा मांडल्या.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याची मागणी पवारांकडे केली. तर, पोलिसांनी आम्हाला मृतदेह कुठे मिळाला, त्याबाबत खोटं सांगितलं. माझ्या भावाला न्याय मिळायला हवा, जो कोणी या हत्येमागे सूत्रधार आहे, त्यालाही अशीच शिक्षा झाली पाहिजे, असं संतोष देशमुख यांच्या बहिणीने शरद पवारांपुढे बोलून दाखवलं.
News Title – Sharad Pawar visit Santosh Deshmukh family
महत्त्वाच्या बातम्या-
संतोष देशमुखांच्या कुटुंबाला शरद पवारांनी दिलं मोठं आश्वासन!
अजितदादांच्या राष्ट्रवादीत महाभूकंप होणार? अंतर्गत हालचाली वाढल्या
“आम्हाला न्याय हवाय”; देशमुख कुटुंबियांची शरद पवारांकडे मागणी
“वाल्मिक कराड कुठं आहेत? पत्ता देतो…”; धनंजय मुंडे काय म्हणाले?
लाडक्या बहीणींची संक्रांत होणार गोड, 2100 रुपये ‘या’ दिवशी मिळणार?