बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार दिल्लीला रवाना; विरोधी पक्षातील विविध नेत्यांना भेटणार

मुंबई | काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आजारपणानंतर पवार दिल्लीत गेलेच नव्हते. मध्यंतरी दोन वेळा त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना डॉक्टरांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता ते दिल्लीला रवाना झाले आहेत.

शरद पवार दिल्लीत गेले असून ते विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांना भेटणार आहेत. प्रकृती व्यवस्थित झाल्यानं त्यांनी लांबवलेली दिल्ली भेट आता केली आहे. यातून कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढू नये, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. मात्र शरद पवार फक्त विरोधीपक्षातील नेत्यांशी चर्चा करणार असल्यानं राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे.

काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत येऊन शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेतली होती. त्यांच्यात तब्बल 3 तास चर्चा झाली होती. या बैठकीचा प्रमुख विषय दिल्ली दरबार होता, असं सांगितलं गेलं होतं. प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. मात्र भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, देशात भाजप विरोधी आघाडी तयार करण्यासाठी शरद पवार सुत्र हलवत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांची आजची दिल्ली भेट महत्वाची असल्याचं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका, पण…”

“एकमेकांवर चपला फेकतील की पुष्पहार अपर्ण करतील, हे तेच ठरवतील”

कोरोना संकटकाळात योगाच आशेचा किरण ठरला- नरेंद्र मोदी

जेमिनसनचा पंजा! भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात

पुण्यातील गर्दीला अजित पवार जबाबदार, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा- प्रविण दरेकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More