मुंबई | नरेंद्र मोदींच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाचव्या रांगेत नव्हे तर पहिल्याच रांगेत स्थान होतं पण पवार शपथविधीला गेले नाहीत, असं वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनेने दिलं आहे.
शरद पवार यांना पाठवलेल्या निमंत्रण पत्रात V रो लिहिलं होतं. खरं तर V रो ही पाचवी लाईन नसून V कोर्ट होतं. पवारांनी आपल्याला पाचव्या रांगेत स्थान दिलंय असं समजून कार्यक्रमाला जाण्याचं टाळलं, असं बोललं जातंय.
शरद पवार यांनी मात्र कार्यक्रमाला न जाण्याचं कारण स्वत:हून अजूनतरी सांगितलेलं नाही किंवा पक्षाच्या वतीने कुणीही तश्या प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, शरद पवार यांना पाचव्या रांगेत स्थान दिल्यामुळे त्यांचा सरकारने अपमान केला आहे, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली होती.
महत्वाच्या बातम्या
-जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील; काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीनेही साधला निशाणा
-काँग्रेसने उडवली प्रकाश आंबेडकरांची खिल्ली; ‘त्यांचा एकही आमदार आमच्या संपर्कात नाही’
-विखे पाटलांनी राजीनामा दिल्यावर काँग्रेस आक्रमक; विखेंवर केला हल्लाबोल
-राष्ट्रवादीचे 10 आमदार आणि राज्यातील संपूर्ण काँग्रेसच माझ्या संपर्कात- प्रकाश आंबेडकर
-…म्हणून आगामी निवडणुकीत राज ठाकरे किंगमेकर बनू शकतात; प्रकाश आंबेडकरांचंं भाकित
Comments are closed.