अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?, शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar | अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात पुन्हा एकदा आले तर त्यांना जागा दिली जाणार का? असा सवाल माध्यमांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना केला. त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, घरात सर्वांना जागा मिळणार आहे. पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. पक्षात संघर्षाच्या काळात उभे राहणाऱ्यांना पक्षात पुन्हा घेणार असं शरद पवार म्हणाले आहेत. अजित पवारांची पुन्हा एकदा घरवापसी होणार की नाही हे पाहणं गरजेचं असणार आहे.

पवार विरूद्ध पवार

वर्षभराआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. तसेच महायुतीतील नेते हे आता शरदचंद्र पवार गटामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. अजित पवार यांच्या भूमिकेमुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला. अनेक दिग्गजांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांचा हात धरला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत नणंद विरूद्ध भावजय अशी लढत झाली. लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना यश मिळालं नाही. केवळ रायगड ही जागा वगळता अजित पवारांना लोकसभेत कुठेही विजय मिळवता आला नाही.

लोकसभेत अजित पवार गटाला फारसं यश मिळालं नाही आणि अनेक नेत्यांची शरद पवार गटात पक्षप्रवेश सुरू झाला. छगन भुजबळ हे महायुतीत खूश नसल्याने त्यांचा कोंडमारा होत असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांची चर्चा सुरू झाली आहे. ते पुन्हा आले तर त्यांना जागा मिळणार का? असा सवाल शरद पवारांना (Sharad Pawar) केला होता. त्यावर बोलत असताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती आहे, लोकं काम तर करणारच. बारामतीतील लोक त्यांच्याशी वर्षानुवर्षाचा संवाद कसा साधत आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. या निवडणुकीत नाहीतर अनेक निवडणुकीत त्या मतदारसंघात फॉर्म भरायला जायचो. शेवटच्या सभेला जायचो. बाकीचा प्रवास करायला गेलो नाही. यावेळचा अपवाद सोडला तर त्याचं कारण म्हणजे माझा आणि मतदारांचा सुसंवाद चांगला आहे. लोकांशी पर्सनल संवाद ठेवला तर … पूर्वी 50 टक्के लोकांना मी नावाने ओळखायचो. आता तसं होत नाही. मतदार आल्यावर त्याच्या वडिलांच्या नावाने ओळखतो. हा एक जनरेशन गॅप आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवारांनी एक किस्सा सांगितला

तसेच यावेळी शरद पवारांनी एक किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की, मला एक बाई दिसली तेव्हा मी काय सुमन? असं विचारलं. त्यावर ती गावात गेल्यावर काम होवो न् होवो मात्र साहेबांनी मला नावाने हाक मारली हे ती सांगते. लोकं हा सुसंवाद विसरत नाही. मला माहिती होतं की घरातील उमेदवार असला तरीही लोकं सुप्रियाला मतदान केल्याशिवाय राहणार नाहीत, असं शरद पवार म्हणाले.

News Title – Sharad Pawar Will Allowed For Ajit Pawar In NCP Sharadchandra pawar

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शरद पवार आहेत काय?, स्वतः पवारांनी केलं मोठं भाष्य

‘लाडका भाऊ योजने’साठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

“वसंत मोरेंवर विनयभंगाचा गुन्हा करा”; मनसे नेत्यांकडून मागणी

“सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या..”; आषाढी एकादशीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

“शरद पवारांपुढं शकुनी मामाही फेल, मराठा समाजाला त्यांनी खूप फसवलं”