कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एक दिवस नक्की भारताचे पंतप्रधान होणार, अशी भविष्यवाणी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केली आहे. ते कोल्हापूरमधील कार्यक्रमात बोलत होते.
शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत ही सर्वांचीच इच्छा आहे. ते एक दिवस नक्की भारताचे पंतप्रधान होणार. ही माझी वाणी आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, जेव्हा ही वाणी खरी ठरेल तेव्हा तुम्ही सर्व साक्षीदार असाल, असंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे डी. वाय. पाटील यांच्या भविष्यवाणीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुंबईचा दूध पुरवठा तोडण्यासाठी आता हार्दिक पटेल मैदानात…
-…ते दोन हिरो कुठेच जाताना दिसत नाहीत- चित्रा वाघ
-क्षणात नोटाबंदी करता, मग राम मंदिर का नाही?- उद्धव ठाकरेंचा सवाल
-भाजप-शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य!
-शिवसेनेला मोठा धक्का; नगराध्यक्षांसह 5 नगरसेवक भाजपमध्ये