सोलापूर | 2019 साली पंतप्रधानपदासाठी खुली स्पर्धा आहे. त्यामुळे शरद पवारांनी पंतप्रधान व्हायचं असेल तर काँग्रेससोबतची युती तोडावी, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ते पंढरपुरात बोलत होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत 20 खासदार निवडून येणाऱ्या पक्षाचा नेता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकसभेच्या 48 जागा अगोदरच वाटून घेतल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, राफेल विमान खरेदीप्रकरणात नरेंद्र मोदींवर ठपका ठेवण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच 2024 मध्ये राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आता पासवानांची डरकाळी, “सांगा देशाला नोटबंदीचा काय फायदा झाला?”
-तो जळत होता आणि लोक त्याचे फोटो काढण्यात व्यस्त होते!
-नितीन गडकरी म्हणतात, “मला पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरायचं नाही!”
-माझ्या नवऱ्याला न्याय द्या, अन् भावाला फाशी द्या!
-नरेंद्र मोदींना जनता पुन्हा मत देणार नाही; पाहा कुणी केली ही भविष्यवाणी…
Comments are closed.