“राष्ट्रवादीचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास शरद पवार पंतप्रधान होतील”

अकोला | राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आले तर शरद पवार हेच देशाचे पंतप्रधान होतील, असं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी केलं आहे.

मेमन महाआघाडीचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचारासाठी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.

आघाडीचे सरकार स्थापन करण्याची वेळ आल्यास, शरद पवार यांचे नाव आघाडीवर असेल, असं मेमन म्हणाले आहेत.

आपचा पक्ष छोटा आहे. मात्र 2-3 खासदार असलेले देवेगौडा यांचे सरकार बनत असेल तर राष्ट्रवादीलाही संधी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-देशाची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही; धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा

-पाण्यावरुन राजकारण करणाऱ्यांनो पुणेकर तुम्हाला नक्कीच पाण्यात बुडवणार- गिरीश बापट

-अमरावतीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे!

पुण्याला ‘योग सिटी’ अशी ओळख मिळवून देणार; गिरीश बापटांची ग्वाही

-…म्हणजे कळेल तुम्ही कोणामुळे निवडून आलात; उदयनराजेंचा चंद्रकांत दादांना टोला