बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार फेसबुकद्वारे संवाद साधणार; कोरोना आणि पालघर प्रकरणावर बोलणार?

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार आहे. सकाळी 11 वाजता त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून ते लाईव्ह असणार आहेत.

देशात तसंच महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. मुंबई पुणे तर कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेलं आहे. अशा परिस्थितीत कालच केंद्रीय पथक मुंबई पुण्यात दाखल झालं आहे. तसंच लॉकडाऊन कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या साऱ्या प्रकरणावर पवार काय बोलतात, याकडे लक्ष असेल. तसंच गुरूवारी पालघरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली.  या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. यावर पवार काय बोलणार, याकडेही लक्ष असेल.

लॉकडाऊन असलेली अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी 20 तारखेला काही नियमांमध्ये शिथिलता आणून ग्रीन झोनमध्ये उद्योगांना परवानगी दिली गेली आहे. तसंच शेतीच्या कामांकरिता आधीही आणि आताही कोणतीही बंधनं नाहीत. आता कापूस खरेदीला देखील सुरूवात होणार आहे. एकूणच कृषी क्षेत्रासाठी आता यापुढचे दिवस अधिक महत्त्वपूर्ण असणार आहेत. यासंबंधित पवारांच्या विवेचनाकडे शेतकऱ्यांचं लक्ष असेल.

दरम्यान, शरद पवार हे आज चौथ्यांदा फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तीन वेळा संवाद साधलेला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राज्यातली सद्यपरिस्थिती तसंच उपाययोजनांची माहिती वेळोवेळी समोर येऊन देत आहेत. कालच मुख्यमंत्र्यांनी पालघर मॉब लिंचिंगवर सविस्तर भाष्य करत या प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नका. गुन्हेगारांची कोणत्याही प्रकारे हयगय करणार नाही. त्यांना शिक्षा झाल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही, असं सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

बाळासाहेब ठाकरे, तुम्ही कुठून तरी पहात आहात?; पालघर घटनेवर लडाखच्या खासदाराचं ट्विट

योगी आदित्यनाथांचा उद्धव ठाकरेंना फोन

महत्वाच्या बातम्या-

सगळं गाव सील करून नागा साधू गावाला घेरणार अन् मग…; नरेंद्रगिरी महाराजांची संतप्त प्रतिक्रिया

पालघर प्रकरणाशी राष्ट्रवादीचा संबंध लावणाऱ्या संबित पात्रांना जयंत पाटलांचं सडेतोड उत्तर

पालघर प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नका- मुख्यमंत्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More