बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार शब्द पाळणार???; राजू शेट्टींनी करून दिली ‘त्या’ बैठकीची आठवण

कोल्हापूर | महाराष्ट्र विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन वाद निर्माण झालेला पहायला मिळत आहे. यासाठी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली व याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे. अशातच आता राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्वाच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना वगळण्यात आल्याचं समजतंय.

राज्यपाल नियुक्त 12 जागांचा हा तिढा अधिक गुंतत चालला असल्याचं चित्र समोर येत आहे. राज्यपालांनी 12 पैकी 4 सदस्यांच्या नावावर आक्षेप घेतल्याची चर्चा सुरू होती. त्यात आता राजू शेट्टी यांच्या नावावरुन संभ्रम पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसनं राजू शेट्टीचं नाव वगळ्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चांवर आता राजू शेट्टीनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दिल्लीत माझी आणि शरद पवारांची बैठक झाली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला होता. राष्ट्रवादीनं लोकसभा मतदारसंघ आमच्यासाठी सोडावा, अशी मागणी राजू शेट्टी केली होती. त्याबदल्यात विधानपरिषदेची जागा देण्याचा शब्द शरद पवार यांनी शेट्टी यांना दिला होता. त्यामुळे आता शब्द पाळायचा की नाही हे, राष्ट्रवादी काॅंग्रेसनं ठरवावं, असं राजू शेट्टी यांनी बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान, बुधवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली. राज्य सरकारनं 12 सदस्यांची राज्यपाल नियुक्तीसाठी नावे पाठवून 9 महिने झाले आहेत. मात्र राज्य सरकारचे शिष्टमंडळ भेटल्यानं 12 आमदारांच्या नियुक्यांचा तिढा सुटणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होते.

थोडक्यात बातम्या – 

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार?; सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

आनंदाची बातमी! राज्याच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“मोदी पंतप्रधान असल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही, हे खूप मोठं यश”

“आम्हाला विकत घेण्यासाठी भाजपला अनेक अंबानी उभे करावे लागतील”

सिद्धार्थ शुक्लाची अखेरची खास पोस्ट व्हायरल, जाणून घ्या काय आहे कारण!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More