Top News राजकारण

ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चेसाठी शरद पवार पश्चिम बंगालला जाणार- नवाब मलिक

तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झालीये. आणि गरज पडल्यास शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जातील, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलीये.

नबाव मलिक म्हणाले, ‘भाजप केंद्र सरकारच्या मदतीने राज्यसरकारच्या अधिकाराचे हनन करुन पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं सरकार पाडण्याचं षडयंत्र रचलं जातंय. कायदा आणि सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्र सरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचं काम करत आहे.”

“या गंभीर विषयावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली आहे. येत्या काही दिवसात सर्व पक्षांशी दिल्लीत चर्चा करून एकजूट करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांची भेटीनंतर शरद पवार करतील,” असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

भाजप केंद्र सरकारचा दुरुपयोग करून निवडून आलेल्या सरकारांचे अधिकार काढून घेण्याचा व त्यांना पाडण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही, असंही नवाब मलिक म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन

भाजपमध्ये काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नाही- चंद्रकांत पाटील

युकेमधून येणाऱ्या विमानांना 31 डिसेंबरपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ब्रिटनमध्ये नवा कोरोनाचा विषाणू; पण भारत सरकार म्हटतंय ‘नो टेन्शन’!

ममता बॅनर्जींचा भाजपवर सर्जिकल स्ट्राईक; भाजप खासदाराच्या पत्नीचा तृणमूलमध्ये प्रवेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या